चीनी बँकांचे कर्ज फेडण्यास उद्योगपती अनिल अंबानी असमर्थ


लंडन – एकेकाळी जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत असलेले रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचे समोर आले असून बाजारातील अनिल अंबानी यांच्या उद्योगांची पत आता शून्यावर आली आहे. आता अनिल अंबानी धनाढ्य नसल्याचे शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.

२०१२ मध्ये वैयक्तिक हमीवर तीन चीन बँकाकडून अनिल अंबानी यांनी ९२५ दशलक्ष डॉलर कर्ज घतले होते. बँकांनी त्यातील ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. १०० दशलक्ष डॉलर रक्कम सहा आठवड्याच्या आतजमा करण्याचे आदेश न्यायलयाने त्यांना दिले आहेत. न्यायालयाने अंबानी यांच्या व्यवसायाचे मूल्य (नेट वर्थ) शून्य असल्याचा दावा मान्य केला नाही.

अनिल अंबानी यांनी कर्ज घेताना मालमत्तेच्या अधिकारांसबंधित कोणतीही वैयक्तिक हमी दिली नसल्याचा दावा केला आहे. देणीदारीच्या तुलनेत अनिल अंबानी यांच्या मालमत्तांचे मूल्य शून्य झाले आहे. बँकांचे कर्ज घेण्यासाठी कोणतीही विकता येण्याजोगी मालमत्ता नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले न्यायालयात सांगितले आहे.

Leave a Comment