हृषीकेश मध्ये बनणार देशातील पहिला काचेचा पूल


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
उत्तराखंड राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ हृषीकेश येथे गंगा नदीवर देशातील पहिला काचेचा पूल बांधला जाणार आहे. येथील जगप्रसिध लक्ष्मण झुला गेल्या जुलैमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यायेण्यासाठी बंद केला गेला आहे. नवा काचेचा पूल या झुल्याला समांतर बांधला जाणार आहे. त्यामुळे पुलावरून जाणारे गंगेच्या पाण्यावर चालल्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

९४ वर्षापूर्वी बांधला गेलेला लक्ष्मण झुला हृषीकेशचे प्रमुख आकर्षण होते. उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश म्हणाले लक्ष्मण झुला वाहतुकीला बंद केल्यावर दुसरा पूल उभारणीची गरज होती आता काचेचा पूल बांधायला सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

या पुलाची रुंदी ८ मीटर तर लांबी १३२.३ मीटर असेल. पुलावर पारदर्शी पण मजबूत काचेच्या फरश्या बसविल्या जाणार आहेत. एकूण रुंदीत मध्ये दीड मीटर रुंद रोड बनविला जाणार आहे. त्यावरून हलकी वाहने जाऊ शकतील. काचा साडेतीन इंच रुंदीच्या असतील त्यामुळे प्रतीवर्ग ७५० किलो वजन त्या सहन करू शकतील. पुलाला आधार देणारे खांब उत्तम दर्जाच्या लोखंडापासून बनविले जातील आणि दोन्ही बाजूला ७ फुट उंचीचे रेलिंग बनविले जाईल. हा पूल किमान १५० वर्षे उत्तम स्थितीत राहील याची काळजी पूल बांधताना घेतली जाणार आहे.

Leave a Comment