सेक्स डॉल्सवर अंत्यसंस्कार करणार जपानी कंपनी


फोटो सौजन्य होपक्लिअर
ऐकायला थोडे विचित्र वाटले तरी हे सत्य आहे. जपान मधील लव्ह डॉल या कंपनीने सेक्स डॉल्सवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली असून त्यासाठी ६३० पौंड किंवा भारतीय चलनात ५८ हजार रुपये आकारले जाणार आहेत. वापरल्या गेलेल्या आणि त्यामुळे नकोशा झालेल्या सेक्स डॉल्सवर ही कंपनी अंत्यसंस्कार करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जपान मध्ये दरवर्षी दोन हजाराहून अधिक लाईफ साईजच्या सेक्स डॉल्स विकल्या जातात. लव डॉलचा जन्मच मुळी प्रेम करण्यासाठी आहे. त्यात जपानी समजुतीनुसार सर्व बाहुल्यांत माणसाप्रमाणे आत्मा असतो. त्यामुळे त्या वापरानंतर कचऱ्यात टाकणे योग्य समजले जात नाही. त्यामुळे या बाहुल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे.

एका मशीनमध्ये या लाईफ साईज सेक्स डॉल्स नष्ट करण्यापूर्वी एक पोर्नस्टार तिच्यासाठी प्रार्थना करेल. ज्यांना सेक्स डॉल मशीन मध्ये मारायची नाही त्यांच्याकडून जादा पैसे आकारून साग्रसंगीत अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय कंपनीने दिला आहे.

Leave a Comment