दोन हजाराच्या नोटा साठवताय, मग हे वाचाच!


अनेकांना म्हणण्यापेक्षा बहुसंख्य भारतीयांना घरात पैसे साठविणे आवडते आणि त्यातही मोठ्या रकमेच्या नोटा अधिक पसंतीच्या असतात. सध्या आपल्या देशात दोन हजाराची नोट सर्वाधिक मुल्याची आहे आणि त्यामुळे अनेकांनी या नोटा घरात साठविल्या असतील. त्यांच्यासाठी ही बातमी वाचणे गरजेचे आहे.

खासगी वेबसाईट बिझिनेस इनसायडर ने नुकताच एक रिपोर्ट दिला आहे. त्यात एका सरकारी बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिखित स्वरूपात एक आदेश जारी करून पैसे काढायला येणाऱ्या ग्राहकांना २ हजार रुपयाच्या नोटा देऊ नयेत तसेच एटीएम मध्येही दोन हजाराच्या नोटा भरू नयेत असे आदेश दिले आहेत असा दावा केला आहे. त्यासाठी एका बँक अधिकाऱ्याचा हवाला दिला गेला आहे. बँकेने हा आदेश कर्मचाऱ्यांना इमेल वरून दिला असून अधिकृत आदेश लवकरच दिला जाणार असल्याचे यात नमूद केले गेले आहे.

अर्थात जे ग्राहक बँकेत दोन हजाराच्या नोटा भरतील त्यांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. बँकेने दोन हजाराच्या नोटा ग्राहकांना देऊ नयेत या आदेशामागाचे कारण म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार देशात सध्या २ हजाराच्या बनावट नोटांचा पूर आला आहे. जितक्या बनावट नोटा सापडल्या आहेत त्यात ५६ टक्के नोटा २ हजाराच्या आहेत. त्यामुळे आता यापुढे १०० रुपये मूल्याचा अधिकाधिक नोटा चलनात आणल्या जाणार आहेत आणि २ हजाराच्या नोटा कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत.

Leave a Comment