टीव्हीच पण २४ कॅरेट सोन्याचा


फोटो सौजन्य डेली मेल
सोन्यापासून अनेक विविध वस्तू बनविल्या गेल्याच्या बातम्या नेहमीच झळकत असतात. सोन्याच्या कार्स आता फारश्या नवलाच्या राहिलेल्या नाहीत, तीच बाब सोन्याची घड्याळे, मोबाईल, जोडे याची. ब्रिटनची अॅक्वाव्हिजन कंपनी चोवीस कॅरेट सोन्याचा टीव्ही घेऊन बाजारात उतरली आहे. या लक्झुरीअस टीव्हीची किंमत १,०८,००० पौंड म्हणजे भारतीय रुपयात १ कोटी रुपये आहे. अतिश्रीमंत व्यक्तींना नजरेसमोर ठेऊन हा टीव्ही बनविला गेला असून लंडनच्या प्रसिद्ध हेरोड्स मध्ये तो विक्रीसाठी ठेवला गेला आहे.

या कंपनीने यापूर्वीही अनेक लग्झरी टीव्ही बनविले आहेत पण हा टीव्ही त्यातील सर्वोत्तम आहे. या १०० इंची टीव्हीला एलसीडी स्क्रीन दिला असून हा टीव्ही वॉटरप्रूफ आहे. ४ के डेफिनेशन मुळे टीव्ही प्रतिमा अतिशय क्लीअर दिसेलच पण त्याची साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम दर्जाची आहे. टीव्हीची फ्रेम आणि स्टँड शुद्ध सोन्याचे आहेत. या टीव्हीला युके, मिडल ईस्ट, युएसइ येथून ऑर्डर येऊ लागल्या आहेत.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मालक अॅलेस्टर बेन म्हणाले आजकाल लक्झरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना प्रचंड मागणी आहे आणि टीव्ही त्याला अपवाद नाहीत. लोकांना विश्रांती, खेळ, काम आणि जगणे सर्व स्टाईल मध्ये करायला आवडते असे दिसते आहे. आमचा नवा टीव्ही युनिक आहे आणि या प्रकारचा जगातला पहिलाच आहे. आमच्या ग्राहकात सेलेब्रिटी, अलिशान हॉटेल्स, बिझिनेस लीडर्स यांचा समावेश आहे. बेन यांनी १९९७ मध्ये पहिला वॉटरप्रूफ टीव्ही घराच्या गॅरेज मध्ये बनविला होता.

Leave a Comment