लवकरच येणार ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’

गेली अनेकदिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपचे डिजिटल पेमेंट फीचर प्रलंबित आहे. मात्र रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी फेसबुकला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून परवानगी मिळाली आहे. लवकरच अधिकृत रित्या व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात लाँच केले जाणार आहे.

दोन वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅप पे ची टेस्टिंग सुरू आहे. एनपीसीआयने व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील डिजिटल पेमेंट सर्व्हिस लायसन्सला परवानगी दिली आहे. डेटा लोकलायझेशनवरून व्हॉट्सअ‍ॅप पेला परवाना मिळवण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र कंपनीने निश्चित केले आहे की व्हॉट्सअ‍ॅप लोकल डेटा रेग्युलेशनला फॉलो करेल.

सुरुवातीला 1 कोटी युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप पे सुरू केले जाईल. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या भारतात अधिक असल्याने कंपनीला याचा फायदा होईल.

व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच झाल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपनी पेटीएमला मोठी टक्कर मिळणार आहे. त्यामुळे पेटीएमचे सीईओ वारंवार व्हॉट्सअ‍ॅप पे वर टीका करत आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणतेही लॉग इन सिस्टम नसल्याने, व्हॉट्सअ‍ॅप पे सुरक्षित नसेल.