या महाठगांनी हॉटेलमध्ये बसून तेच विकण्याचा रचला कट, मात्र…

अनेकदा आपण एकच जमीन अनेक जणांना विकल्याचा ऐकतो. तसेच काही ठगांनी तर ताजमहाल, आयफेल टॉवर सारख्या जगप्रसिद्ध वास्तू विकण्याचा प्रयत्न केल्याचे देखील तुम्ही ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार चेन्नईमध्ये उघडकीस आला. चेन्नईमधील एका हॉटेल लॉबीमध्ये बसून 3 महाठगांनी थेट तेच हॉटेल 165 कोटींना विकण्याचा कट रचला.

चेन्नई येथील अंबिका एम्पायर या 3 स्टार हॉटेलमध्ये बसून 5 जण हॉटेल विकण्याविषयी चर्चा करत होते. त्यांनी हॉटेल खरेदी करणाऱ्यांना हॉटेलचे मालक आणि जनरल मॅनेजर अशी ओळख करून दिली होती. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे बोलणे ऐकल्यावर याबाबतची माहिती हॉटेल मॅनेजरला दिली. मॅनेजरने याबाबत खऱ्या मालकाला सांगितले व सर्व स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, या ठगांनी केरळमधील एका खाजगी कंपनीशी संपर्क साधला होता. त्यांनी कंपनीची एक टीम चेन्नईला आली व हॉटेलमध्ये थांबली. पुर्ण हॉटेल व्यवस्थित रित्या पाहिले व हॉटेलला 165 कोटींना विकण्याचे निश्चित झाले होते.

वाडापलानीच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला हॉटेल मॅनेजमेंटकडून तक्रार आली होती. आम्ही घटनास्थळी पोहचलो व चौकशी केल्यावर समोर आले की ते फसवे होते.

यानंतर पोलिसांनी वरुणाकरण (70), परमानंदम (55) आणि दक्षिणामुर्ती (60) यांना अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

Leave a Comment