फॉर्च्युनर आणि एंडेव्हरला टक्कर देणार एमजी मोटर्सची ‘ग्लोस्टर’

ऑटो एक्स्पो 2020 मध्ये एमजी मोटरने आपली बहुप्रतिक्षित फूल साईज एसयूव्ही एमजी ग्लोस्टरवरील (MG Gloster) पडदा हटवला आहे. हेक्टर आणि हेक्टर+ नंतर एमजीची भारतातील ही तिसरी एसयूव्ही आहे.

ग्लोस्टर तीन सीट्स असणारी फुल साइज एसयूव्ही आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीची टक्कर टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड Endeavour आणि महिंद्रा Alturas सोबत होईल.

 

Image Credited – Navbharattimes

एमजी ग्लोस्टरचा लूक खूपच आकर्षक आणि बोल्ड आहे. एसयूव्हीच्या पुढील बाजूला क्रोम स्लेट्ससोबत मोठे ग्रिल आणि एलईडी डीआआरएलसोबत एनईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प दिले आहेत. बोनेटवर बोल्ड लाइन्स आणि बंपरवर दोन्ही बाजूला क्रोम बेझल्ससह फॉगलॅम्प हाउसिंग देण्यात आले आहे. एमजीच्या या एसयूव्हीमध्ये बोल्ड एलॉय व्हिल्ज आणि एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहेत. आपल्या सेगमेंटची ही मोठी एसयूव्ही आहे.

ग्लोस्टरचे इंटेरिअर देखील प्रिमियम आहे. यामध्ये लेदर अपहोस्ट्री मिळेल. एसयूव्हीमध्ये अँम्बिएंट लायटिंग, 3-झोन ऑटोमॅटिक एसी, 8-इंच मल्टी-इंफॉर्मेशन इंस्ट्रूमेंट क्लस्टर डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, पॅनोरमिक सनरूफ आणि 12.3-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स मिळतील.

Image Credited – Navbharattimes

आंतरराष्ट्रीय बाजारात या एसयूव्हीमध्ये 224 एचपी पॉवर वाले 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन येते. सोबतच 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. भारतीय बाजारात या एसयूव्हीमध्ये 218 एचपी पॉवर देणारे 2.0 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

Image Credited – Navbharattimes

एमजी ग्लोस्टर एसयूव्ही या वर्षीच्या अखेरपर्यंत अथवा वर्ष 2021 च्या सुरुवातीला भारतात लाँच होईल. या एसयूव्हीची किंमत 35 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.