हा भारतीय वैज्ञानिक कोरोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील लस शोधण्याचे काम वैज्ञानिक करत आहेत. आता ऑस्ट्रेलियात एका अनिवासी भारतीयाच्या नेतृत्वाखालील एक टीमने या व्हायरसरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायरस जमा करण्यात यश मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या एका हाय-सिक्युरिटी लॅबमध्ये यावर संशोधन करण्यासाठी पर्याप्त स्टॉक उपलब्ध आहे.

ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी मागील आठवड्यात एका व्यक्तीद्वारे मिळालेल्या व्हायरसच्या नमुण्यांना वेगळे करण्यास यश मिळवले होते. संस्थेमध्ये यावर प्री-क्लिनिकल अभ्यास करण्यासाठी यासाठी अधिक मात्रेत व्हायरसची गरज आहे.

संस्थेचे प्राध्यापक एसएस वासन म्हणाले की, आम्ही डॉर्टी इंसिट्यूटच्या सहकार्यांचे आभार मानतो, ज्यांनी वेगळ्या केलेल्या व्हायरसला आमच्यासोबत शेअर केले. खऱ्या व्हायरसवर काम वेगाने होते व प्री क्लिनिकल अभ्यास करून लस बनविण्यास मदत होते.

वासन यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन एनिमल हेल्थ लॅबमध्ये इतर सहकारी देखील डायग्नोस्टिक, सर्विलांस आणि रिस्पॉन्सवर काम करत आहेत.

त्यांनी सांगितले की, लॅबमध्ये अधिक व्हायरस जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप त्यांनी याच्या संख्येबाबत माहिती दिली नाही. प्री क्लिनिकल अभ्यासाठी लस बनविण्या व्यतरिक्त याद्वारे औषध बनविण्यास देखील मदत होईल.

बीआयटीएस पिलानी आणि आआयएससी – बंगळुरूचे विद्यार्थी असलेले वासन यांनी स्कॉलरशिप मिळणाल्यानंतर ऑक्सफॉर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तेथे डॉक्टरेट झाल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि जीका सारख्या व्हायरसवर काम केले आहे.

Leave a Comment