चक्क रेल्वेच्या डब्ब्याचे बनविले कॅन्टिन

भारतीय रेल्वेच्या पुर्व मध्य रेल्वे झोनकडे पटना येथील दानापूर कोचिंग डेपो येथे एकही कॅन्टिन नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून येत असे. यावर आता पुर्व मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एक खास कल्पना लढवली आहे. रेल्वेने दानापूर कोचिंग डेपोमध्ये भंगारात पडलेल्या एका रेल्वेच्या डब्ब्यालाच थेट कॅफेटेरियामध्ये बदलले आहे. हे कॅफेटेरिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आता एकाच वेळी 40 कर्मचारी या कॅन्टिनमध्ये बसून जेवणाचा, नाश्त्याचा आनंद घेऊ शकतील. यासोबत रेल्वेने या कॅन्टिनचे इंटेरिअर देखील आकर्षक बनवले आहे. डब्ब्याच्या भितींवर पेटिंग्स, टाइपरायटर सारख्या जुन्या वस्तू आणि दानापूर रेल्वे स्टेशनचे जुने फोटो देखील लावले आहेत.

Image Credited – Livemint

कोचिंग डेपोचे अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, डेपोच्या जवळ कोणतेही हॉटेल अथवा कॅफे नसल्याने कर्मचाऱ्यांची अनेकदा तक्रार येत असे. डेपोजवळच एखादे कॅफे असावे अशी त्यांची इच्छा होती. रेल्वेचे अनेक डब्बे असेच पडून असल्याने आम्ही याला कर्मचाऱ्यांना नाश्ता करता यावा यासाठी कॅन्टिन बनविण्याचा निर्णय घेतला.

Image Credited – Livemint

दानापूर कोचिंग डेपोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आधी चहा पिण्यासाठी देखील लांब जावे लागत असे. मात्र या नव्याने सुरू झालेल्या कॅफेटेरियामुळे खूप फायदा झाला आहे.

Image Credited – Livemint

कॅफेटेरियाच्या प्रमुखाने सांगितले की, सध्या कॅफेटेरिया हे रेल्वेच्या खाजगी विभागाद्वारे संचालित करण्यात येत आहे. आतापर्यंत चांगला प्रतिसाद येत असून, कॅफेटेरियामध्ये एकाचवेळी 40 जण बसू शकतात. यातील 10 सीट व्हीआयपी आणि 30 सीट जनर्ल आहेत.

Leave a Comment