काय काय विचारले भारतीयांनी ‘अ‍ॅलेक्सा’ला 2019 मध्ये

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील इंटरनेटचा वापर वेगाने वाढला आहे. इंटरनेटच्या वापरामुळे डिजिटल असिस्टंट वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. गुगल असिस्टंट, अ‍ॅपल सिरी, अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा या  डिजिटल असिस्टंटचा वापर भारतीय करतात. हे स्मार्ट स्पीकर आपल्या आयुष्याचा आपला भाग झाले आहेत.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साला आपण क्रिकेट स्कोर, गाणीपासून ते अनेक गोष्टींसाठी कमांड देतो. मात्र 2019 मध्ये भारतीयांना अ‍ॅलेक्साला सर्वाधिक वेळा काय विचारले आहे तुम्हाला माहिती आहे ?

वर्ष 2019 मध्ये भारतीयांना प्रत्येक आठवड्याला अ‍ॅलेक्सासोबत लाखोवेळा संवाद साधला आहे. यावेळी भारतायांनी प्रत्येक 1 मिनिटाला अ‍ॅलेक्साला ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे. तर प्रत्येकी 2 मिनिटांनी ‘अ‍ॅलेक्सा, माझ्याशी लग्न करणार का ?’ आणि दर आठव्या मिनिटाला ‘अ‍ॅलेक्सा कशी आहेस ?’, हे प्रश्न विचारले आहेत.

ऑन डिमांड म्यूझिकसाठी अ‍ॅलेक्साला कमांड देण्यास देखील भारतीय मागे नाहीत. 2019 मध्ये संगीत प्रेमींनी दर 1 मिनिटाला 1 हजार पेक्षा अधिक वेळा अ‍ॅलेक्साला गाणे लावण्यास कमांड दिले आहे.

Leave a Comment