गुगल मॅप्स देणार हॉटेल टेबल, बसमधील रिकाम्या सीटची माहिती

गुगल मॅप्स आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर आणत असते. आता गुगल मॅप्सने आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणले आहे, ज्याद्वारे रस्त्यांनी जाताना येणाऱ्या हॉटेलबद्दल देखील माहिती मिळेल. एवढेच नाहीतर गुगल मॅप्स त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी शाकाहारी, मांसाहारी, जैन, वेगन अथवा कॉन्टिनेंटल इत्यादीमध्ये काय पर्याय आहे, याची देखील माहिती देईल.

गुगल मॅप्स तुम्हाला तुम्ही निवडलेल्या हॉटेलमध्ये गर्दी आहे की तुम्हाला बसण्यास जागा मिळेल. तसेच, मेट्रो, बस आणि लोकल ट्रेनमध्ये सीट मिळेल की नाही, याची माहिती देखील युजर्स गुगल मॅप्सद्वारे घेऊ शकतात.

लाईव्ह व्ह्यूचे फीचर देखील युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. ज्या देशांमध्ये स्ट्रीट व्ह्यू आहे, तेथील युजर्सला हे फीचर वापरता येईल. सध्या भारतात हे फीचर उपलब्ध नाही.

8 फेब्रुवारीला गुगल मॅप्सला 15 वर्ष पुर्ण होणार आहेत. या निमित्ताने गुरुवारी गुगल मॅप्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्जपॅट्रिक म्हणाले की, जगभरात गुगल मॅप्सद्वारे युजर्स दररोज सरासरी 100 कोटी किमीचा प्रवास करतात. गुगल मॅप्सने मागील वर्षी बस, मेट्रो, लोकल रेल्वमध्ये गर्दी दर्शवणारे फीचर सुरू केले होते. हे फीचर यशस्वी ठरले होते. आता महिलांसाठी कोच आहे की नाही, बस-डब्ब्यात गार्ड, मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहे की नाही ? याची देखील माहिती मिळेल.

गुगल मॅप्स सध्या 220 देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये युजर्ससाठी सेव्हड, कॉन्ट्रिब्यूट, अपडेट्स, रिव्ह्यू, कंटेट असे अनेक फीचर्स आहेत.

Leave a Comment