कोरोनाच्या भितीने जोडप्याने लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहुण्यांसमोर केले लग्न

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळे सिंगापूरमधील एका जोडप्याने काही दिवसांपुर्वी थेट लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहुण्यांसमोर लग्न केल्याची घटना समोर आली आहे. जोसेफ यू आणि त्यांची पत्नी कांग टांग काही दिवसांपुर्वीच चीनमधून परतले होते. यामुळे पाहुण्यांना भिती होती की, दोघांना संसर्गतर झालेला नाही. त्यांनी लग्नाला येण्यास नकार दिला.

दोघेही 24 जानेवारीला चीनमधील हुनान येथे गेले होते. येथे कांग टांगचे कुटुंब राहते. दोघेही 30 जानेवारीला सिंगापूरला परतले, कारण 2 फेब्रुवारीला त्यांचे लग्न होते. यासाठी हॉटेलमध्ये बुकिंग देखील करण्यात आले होते. पाहुण्यांना याबद्दल कळाल्यावर त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली.

Image Credited – Bhaskar

या जोडप्याने सांगितले की, सिंगापूरवरून परतल्यावर डॉक्टरांनी सांगितले होते की 14 दिवसांपर्यंत कोणाशीही संपर्कात राहू नये. मात्र लग्न देखील त्याच दिवसांमध्ये होते. त्यामुळे लग्न टाळावे की पाहुण्यांना बोलवू नये, असा प्रश्न होता. मात्र हे दोन्ही पर्याय योग्य नव्हते.

यानंतर दोघांनी लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाहुण्यांना लग्नाच्या ठिकाणी बोलवले. मात्र ते स्वतः त्या ठिकाणी गेले नाहीत. त्यांनी हॉटेलच्या रुममधून लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहुण्यांसमोर लग्न केले व त्यांना अभिवादन दिले. लग्नाला आमंत्रित करण्यात आलेल्या 190 पाहुण्यांपैकी 110 पाहुणे लग्नाला उपस्थित होते.

Leave a Comment