सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची माहिती देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

जगभरात शेकडो जणांचे प्राण घेणाऱ्या कोरोना व्हायरसची सर्वात प्रथम माहिती देणाऱ्या चीनच्या डॉक्टरचा या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टर ली वेनलियांग हे या व्हायरसचे प्रमुख केंद्र ठरलेल्या वुहान शहरात नेत्रतज्ञ होते. यावेळी त्यांच्या लक्षात आले की 2002-03 मध्ये सिवियर एक्यूट रेस्पीरेटरी सिंड्रोम (सार्स) विषाणू सारखीच लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत.

34 वर्षीय ली यांनी आपल्या सहकाऱ्याला देखील याबाबत माहिती दिली. मात्र ली यांच्यासह अफवा पसरवत असल्याचे सांगत 8 जणांना पोलिसांनी पकडले होते. ली यांना देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. अखेर वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.

आतापर्यंत 500 पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला असून, 28 हजारांपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर लाखो लोक आपल्या घरात बंद आहेत.

रुग्णांमध्ये सार्स विषाणुंची लक्षणे आढळल्यावर ली यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती देत सुरक्षा करणारे मास्क आणि कपडे घालण्यास सांगितले होते. यानंतर 4 दिवसांनी ली यांच्यासह 8 जणांनी अफवा पसरवल्याच्या कारणामुळे अटक केले होते. ली यांनी जानेवारीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले होते की, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली असल्याचे मान्य करण्यासाठी त्यांना एका पत्रावर स्वाक्षरी देखील करण्यास सांगितले होते.

चीनमधील सोशल मीडिया युजर्ससाठी ली वेनलियांग एकप्रकारे हिरो झाले असून, नेटकरी हुबई अधिकाऱ्यांनी वेळेवर योग्य पाऊले न उचलल्यामुळे संताप व्यक्त करत आहेत.

Leave a Comment