शाहरुखच्या हस्ते नवीन जनरेशन ‘ह्युंडई क्रेटा’ सादर

ऑटो एक्स्पो 2020 मध्ये ह्युंडईने आपली नवीन जनरेशन क्रेटावरील पडदा हटवला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान देखील उपस्थित होता. फर्स्ट जनरेशन क्रेटा भारतीय बाजारात लोकप्रिय ठरली होती. जुन्या जनरेशनच्या तुलनेत सेकेंड जनरेशन क्रेटामध्ये अनेक आकर्षक बदल करण्यात आलेले आहेत.

नवीन क्रेटामध्ये टेलगेट देखील आकर्षक डिझाईनमध्ये देण्यात आले आहे. यासोबतच सिग्नेचर कास्केडिंग ग्रिल देण्यात आली आहे, जी डीआरएल आणि एलईडी लॅम्प्सने घेरलेली आहे. आकाराच्या बाबतीत देखील नवीन क्रेटा मोठी आहे.

Image Credited – NDTV

नवीन जनरेशन क्रेटामध्ये किआ सेल्टोसचेच इंजिन देण्यात आलेले आहे. यामध्ये बीएस-6 मानक 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहेत. जे 140 बीएचपी पॉवर जनरेट करणारे 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन देखील देण्यात आलेले आहे. जे 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससोबत येते. हे तिन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्यायासह येतात. डिझेल इंजिनमध्ये पर्यायी 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्स देखील मिळेल.

Image Credited – NDTV

नवीन क्रेटामध्ये मोठी 10.4 इंच स्क्रीन देखील मिळेल. या स्क्रीनमध्ये ब्लूलिंक कनेक्टेड कार अप आणि टेलेमेटिक्स सोल्यूशन सपोर्ट देखील मिळेल. यामध्ये ईसीम सपोर्ट देखील मिळेल, ज्याद्वारे सर्व डेटा फीचर्स वापरता येतील.

नवीन क्रेटाच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन, 2 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी हे फीचर्स मिळतील. टॉप व्हेरिएंटमध्ये सनरुफ इनबिल्ट एअर फ्यूरिफायरसोबत, पॉवर एजस्टेबल सीट्स देखील मिळेल. नवीन ह्युंडई क्रेडा मार्च 2020 मध्ये लाँच केली जाणार आहे, तेव्हाच याच्या अधिकृत किंमतीविषयी माहिती मिळेल.

Leave a Comment