1.38 कोटींची मर्सिडिज बेंझ ‘मार्को पोलो’ भारतात लाँच

जर्मनीची लग्झरी कार कंपनी मर्सिडिज बेंझने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली लग्झरी कार व्ही-क्लास मार्को पोलो लाँच केली आहे. व्ही क्लास सीरिजमधील मागील वर्षभरात भारतात लाँच करण्यात आलेली ही तिसरी कार आहे.

मार्को पोलो दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यातील मार्को पोलो हॉरिझोन व्हेरिएंटची किंमत 1.38 कोटी आणि मार्को पोलोची किंमत 1.46 कोटी रुपये आहे. भारतात कमर्शियल वापरासाठी बनलेली ही पहिली लग्झरी कॅम्पर आहे. या एमपीव्हीमध्ये अनेक अशा सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या एखाद्या घरापासून प्रेरित आहेत.

Image Credited – NDTV

मार्को पोलोचे कॅबिन कॉम्पॅक्ट आणि आरामदायी राहण्याच्या हिशोबाने बनविण्यात आले आहे. यामध्ये सामान्य आणि पर्यायी असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये किचन टेबलसोबत सिंक, रिट्रॅक्टेबल केबल, बेडमध्ये बदलणारे बेंच सीट्स आणि रुफ टेंट असे अनेक फीचर्स आहेत.

मर्सिडिज बेंझ व्ही क्लास मार्को पोलो एमपीव्हीमध्ये 2.2 लीटर 4 सिलेंडर बीएस 6 डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 161 बीएचपी पॉवर आणि 380 एनएम टॉर्क जनरेट करते. यात कंपनीने 7जी ट्रॅनिक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. यामध्ये कंपनीने अधिक व्हिलबेस देखील दिला आहे.

Image Credited – NDTV

सामान्य व्ही क्लासच्या तुलनेत मार्को पोलोमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये कमांड इंफोटेनमेंट सिस्टम, नवीन मल्टी-फंक्शनल स्टेअरिंग व्हिल, मोठे ट्विन-पॉड इंस्ट्रुमेंट क्लस्टरसोबत मध्यभागी एमआयडी यूनिट, अटेंशन असिस्ट, क्रॉसविंड असिस्ट, हेडलाइट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एक्टिव पार्किंग असिस्ट आणि 360 डिग्री कॅमेऱ्याचा समावेश आहे.

Leave a Comment