लाँच होण्यापूर्वीच मोटो जी पॉवर ८ अमेझॉनवर स्पॉट


फोटो सौजन्य जागरण
मोटोरोलाच्या मोटो जी पॉवर ८ लॉन्चिंगची अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वीच युकेच्या इ कॉमर्स अमेझॉनवर हा फोन स्पॉट झाला आहे. या महिन्यात बार्सिलोना येथे होत असलेल्या वर्ल्ड मोबाईल कॉंग्रेस मध्ये हा फोन सादर केला जाईल असे सांगितले जात असताना गिकबेचवर हा फोन लिस्ट झाल्याचे आणि त्याच्या फिचर्सचा खुलासा केला गेल्याचे म्हटले आहे.

अमेझॉनवर हा फोन फोटो सह स्पॉट झाला आहे. त्यानुसार या फोनला रिअर मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि त्याच्याशेजारीच फिंगरप्रिंट सेन्सर दिसत आहे. पंचहोल डिस्प्ले असलेल्या या फोनला ६.४ इंची फुल एचडी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन ६६५ चीपसेट, ४ जीबी रॅम, आणि ६४ जीबी स्टोरेज असेल. त्याला १६ एमपीचा प्रायमरी, २ एमपीचा मॅक्रो लेन्स व अन्य दोन सेन्सर असतील तर सेल्फी साठी २५ एमपीचा कॅमेरा असेल. अँड्राईड १० ओएस, ५००० एमएएचची बॅटरी दिली गेली असल्याचे आणि हा फोन ब्लॅक आणि ब्ल्यू अश्या दोन रंगात येईल असेही म्हटले गेले आहे.

Leave a Comment