कोरोना विषाणू बळींचा खरा आकडा धक्कादायक


फोटो सौजन्य डीआयएसएम
चीन मध्ये प्रकोप झालेल्या कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्यांची संख्या चीन सरकारने ५६० वर गेल्याचे जाहीर केले असले तरी हा आकडा फसवा असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचे मुख्य कारण आहे ते चीनमधील दोन नंबरची बडी कंपनी टेन्सेटच्या वेबसाईटवर लिक झालेला आणि व्हायरल होताच काही वेळात बदलला गेलेला डेटा. या कंपनीने एपिडेमिक सिच्युएशन ट्रॅकर वर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा प्रसार १,५४,०२३ लोकांपर्यंत झाला असून २४५८९ जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यूचे हे आकडे धक्कादायक आहेत. पण विशेष म्हणजे हे आकडे लिक होताच कंपनीने ते बदलले पण तेही सरकारी आकड्यांबरोबर जुळणारे नाहीत. बदलल्या गेलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मुळे १४४४६ जणांना लागण झाली असून त्यातील ३०४ लोक मृत्युमुखी पडले आहेत.


सोशल मीडियावर टेन्सेन्ट डेटा लिक झाल्याबरोबर चीनी सरकारने कोरोना विषाणू मृत्यू माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. तैवान न्यूजने अनेक देशात टेन्सेन्ट डेटा लिक झाल्याची बातमी देताना तो चुकीने लिक झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे तर अन्य एका दाव्याप्रमाणे कोरोना बाबत खरी माहिती जगासमोर यावी म्हणून टेन्सेन्टमधील जबाबदार व्यक्तीने तो डेटा जाणूनबुजून लिक केला आहे. सोशल मीडियावर हंगामा होताच कंपनीने हा डेटा हटवून नवीन डेटा प्रसिद्ध केला आहे.

Leave a Comment