व्हेलेंटाइन डेला 6 लाखांची ‘पिझ्झा’ अंगठी जिंकायची आहे ? करा हे काम

यंदाच्या व्हेलेंटाइन डेसाठी डॉमिनोजने एका खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला खास डायमंड पिझ्झा अंगठी डॉमिनोजकडून मिळणार आहे. डॉमिनोज ऑस्ट्रेलियाने या खास डायमंड पिझ्झा रिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली.

या अंगठीमध्ये एक पिझ्झा स्लाइस आहे. ज्याच्यावरती रुबीज आणि डायमंडचे चीझ आणि पेपरोनी आहे. ही अंगठी एका महिलेला व्हेलेंटाइन डेच्या दिवशी मिळेल. या अंगठीची किंमती 9 हजार डॉलर (जवळपास 6.40 लाख रुपये) आहे.

Planning a truly 'dough-mantic' proposal this V-day? 🍕💍For the chance to win this one-of-a-kind pizza slice ENGAGEMENT…

Posted by Domino's Australia on Tuesday, February 4, 2020

डॉमिनोजच्या या अंगठीचे वजन एक कॅरेटपेक्षा अधिक आहे. ही अंगठी जिंकण्यासाठी युजर्सला 30 सेंकदाचे व्हिडीओ शेअर करावे लागतील. या व्हिडीओमध्ये त्यांना सांगावे लागेल की, त्यांच्या एंगेजमेंटमध्ये डॉमिनोड पिझ्झा कशाप्रकारे अधिक रोमँटिकपणा वाढतो. युजर्स 12 फेब्रुवारीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात.

सोबतच जे कोणी जिंकले त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल, जेणेकरून त्याच्या जोडीदारासाठी ही अंगठी एक सरप्राइज असेल.

सोशल मीडियावर या डायमंड पिझ्झा अंगठीचे फोटो व्हायरल होत असून, अनेक युजर्सनी आपण ही अंगठी जिंकणार असल्याचे कमेंट्समध्ये सांगितले.

Leave a Comment