कुत्र्याच्या एका पिल्लाची किंमत चक्क १९ लाख रुपये


तुम्ही आजवर अनेक प्रजातींच्या कुत्र्यांबद्दल ऎकले असेल. त्यात अनेक कुत्र्यांच्या धक्कादायक किंमतीही तुम्ही ऎकल्या असतील. जेवढी दुर्मिळ जात कुत्र्याची असेल त्याची किंमत तेवढी जास्त असते. पण अमेरिकेतील या कुत्र्याच्या पिल्लांची किंमत ऎकून तुम्हाला शॉक नक्की बसेल. अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये राहणा-या जगातील सर्वात मोठ्या पिटबुल कुत्र्याच्या एका पिल्लाची किंमत १९ लाख रूपये ऐवढी आहे.

नुकताच ८ पिल्लांना जगातील सर्वात मोठ्या पिटबुल डॉगी असलेल्या हल्कने जन्म दिला. यातील प्रत्येक पिल्लाची किंमत ही १९ लाख रूपये ऐवढी आहे. त्यानुसार १.५८ करोड रूपये ऐवढी आठही पिल्लांची किंमत होते. म्हणजे या पिल्लांमुळे हा डॉगी आणि त्याचा मालक करॊडपती झाले आहेत. मार्लन ग्रेनन असे या पिटबुल डॉगीच्या मालकाचे नाव आहे. या पिटबुल डॉगीचे वजन ७६ किलो असून हल्क एक ट्रेन्डी डॉगी आहे. या कुत्र्याला जगभरात चांगलीच मागणी आहे. पिटबुल हे खतरनाक जातीचे कुत्रे मानले जातात तरीही त्यांची मागणी मोठी आहे. हल्क हा डॉगी त्याच्या आकारामुळे गेल्यावर्षीपासून चर्चेत आला होता.

कुत्रा पाळण्याची अनेकांना हौस असते त्यानुसार प्रत्येकजण हा वेगवेगळ्या प्रकारची कुत्री पाळत असतो. अनेक परदेशी कुत्री भारतातही बघायला मिळतात. अशाचप्रकारचा एका दुर्मिळ जातीचा कुत्रा चीनमध्येही लोकप्रिय असून त्याचीही किंमत अशीच गगनाला भिडणारी अशीच आहे.

Leave a Comment