त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणाऱ्या सलीम मर्चेंटचे नेटकऱ्यांकडून कौतुक


आपल्या गाण्यांमुळे आणि त्यांना दिलेल्या संगीतामुळे संगीतकार सलीम मर्चेंट अनेकांची मने जिंकत असतो. पण तो एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे या चर्चा सुरु झाल्या असून सलीमचे हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.


काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जाऊन सलीमने शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्याने आपल्या ट्विटरवर दर्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तू एकात्मतेचे उदाहरण आहे असे एका नेटकऱ्याने म्हणत सलीमचे कौतुक केले आहे. तर तुझ्या सारख्या आणखी १०० लोकांची गरज असल्याचे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे.

बॉलिवूडमध्ये सलीम आणि सुलेमान ही लोकप्रिय संगीतकार जोडी असून बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटातील गाणी या जोडीने कम्पोज केली आहेत. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जौहरच्या ‘काल’ चित्रपटातील गाणी कम्पोज करत त्यांनी बॉलिवूडचा प्रवास सुरु केला.

Leave a Comment