मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही ‘व्हिटारा ब्रेझा’ फेसलिफ्टवरील पडदा हठवला आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल इंजिनचा आहे. आतापर्यंत डिझेल इंजिनसह येणारी ही एसयूव्ही आता पेट्रोल इंजिनमध्ये येणार आहे. कंपनीने नवीन मॉडेलच्या एक्सटेरिअरमध्ये देखील काही बदल केले आहेत. ज्यामुळे गाडीचा लूक एकदम नवीन वाटतो.
नवीन दमदार लूकसह बहुप्रतिक्षित मारुती ‘व्हिटारा ब्रेझा’ सादर
या नवीन मॉडेलमध्ये कंपनी बीएस6 मानक 1.5 लीटर के-सीरिज पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 103 बीएचपी पॉवर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड देण्यात आले आहे. एसयूव्हीमध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजीसोबत ऑटोमेटिक ट्रांसमिशन देखील मिळेल.
कंपनीचा दावा आहे की या एसयूव्हीचे मायलेज मॅन्युअल गिअरबॉक्ससह प्रती लीटर 17.03 किमी आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशनमध्ये याचे मायलेज प्रती लीटर 18.76 किमी आहे.
मारुती ब्रेझामध्ये कंपनीने नवीन ग्रिल आणि इंटीग्रेटेड एलईडी डीआरएल व हेडलँम्प, नवीन बंपर, नवीन फॉग लँम्प हाउसिंग आणि बुल-बार स्किड प्लेट दिली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन ब्रेझाचा फ्रंट लूक फ्रेश, अधिक आकर्षक आणि स्पोर्टी वाटतो. एसयूव्हीमध्ये 16-इंचचे नवीन एलॉय व्हिल्ज देण्यात आलेले आहेत.
ब्रेझा फेसलिफ्टमध्ये मागील बाजूला एलईडी टेललँम्प देण्यात आलेले आहेत. मात्र डिजाइनमध्ये कोणताही बदल नाही. ही नवीन एसयूव्ही 3 रंगात उपलब्ध असून, कंपनी यासोबत कस्टमायझेशन आणि पर्सनलायझेशनचे अनेक पर्याय दिले आहेत.

नवीन ब्रेझाच्या कॅबिनमध्ये 7-इंच नवीन स्मार्टप्ले टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे. ही इंफोटेनमेंट सिस्टम लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, वॉइस रिकग्निशन, व्हिइकल अलर्ट आणि क्यूरेटेड ऑनलाइन कॉन्टेंट सोबत येते. या इंफोटेनमेंट सिस्टममध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपॉर्ट करते.
ऑटो एक्स्पो 2020 मध्ये या एसयूव्हीला केवळ लोकांसाठी सादर करण्यात आले असून, याचे अधिकृत लाँचिंग या महिन्याच्या अखेर होईल. त्याचवेळी कंपनी या एसयूव्हीची किंमत जाहीर करेल.