कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉडीबिल्डर डॉक्टर आली पुढे

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 8 हजारांपेक्षा अधिक जणांना हा आजार झाला आहे. यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. आता चीनची एक डॉक्टर यूआन हेरांग लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. यूआन बॉडीबिल्डर देखील आहे.

यूआनने इंस्टाग्रामवर लिहिले की, या व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी आम्ही पुर्ण प्रयत्न करू व याला रोखण्यासाठी व उपचाराचा नक्कीच शोध घेऊ.

इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये यूआन हॉस्पिटलमध्ये दिसत असून, तिने लिहिले की, मी एक डॉक्टर असून, नेहमीच पुढे राहिल. या आजारापासून निपटण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.

यूआनने पारंपारिक चीनी औषधांचा अभ्यास केलेला आहे. वर्ष 2016 मध्ये तिने व्यायाम करम्यास सुरुवात केली होती. यानंतर ती प्रोफेशन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देखील भाग घेऊ लागली.

लोकांना प्रेरित करण्यासाठी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. तिने अनेक टिव्ही कार्यक्रमात देखील काम केलेले आहे.

Leave a Comment