हा स्मार्ट पंखा आवाजाने करता येणार कंट्रोल

लग्झेयर कंपनीने भारतात आपली नवीन पंखा सादर केला आहे. कंपनीचा हा पहिला असा स्मार्ट पंखा आहे, ज्यात इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) इनेबल्ड आहे. या स्मार्ट पंख्यामध्ये ब्रशलेस डीसी मोटर देण्यात आली आहे. या पंख्याचे मॉडेल आयओटी इनेबल्ड लक्स 5130 आहे.

सर्वसाधारणपणे भारतातील पंख्यांना तीन पाती असतात. मात्र या पंख्याला 4 पाती आहेत. या स्मार्ट पंख्याला फोन अथवा रिमोटने कंट्रोल करता येईल. या पंख्यात वाय-फायचा देखील सपोर्ट मिळेल.

या पंख्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी रेग्युलेटर लावायची देखील गरज नाही. या पंख्याला अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा देखील सपोर्ट करते. त्यामुळे वॉइस कमांडद्वारे देखील हा पंखा कंट्रोल करता येईल.

तुम्ही बोलून पंख्याचा स्पीड आणि मोड बदलू शकता. याशिवाय पंख्याला रिव्हर्स रोटेशन आणि कमी व मंद प्रकाशासाठी देखील वॉइस कमांड देऊ शकता. अ‍ॅलेक्सा व्यतरिक्त पंख्यात गुगल असिस्टेंट आणि सिरी देखील सपोर्ट करेल.

हा पंख 4 पाती आणि मॅट व्हाइट पातीसोबत मॅट व्हाइट मोटर आणि वॉलनट कलर पातीसोबत ब्लॅक मोटर या 2 रंगाच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

पंख्यासोबत लाईट देखील मिळेल, जी 20 वॉटची वॉर्म लाइट 3000 एलईडी लाईट असेल. पंख्याचा टॉप स्पीड 218 आरपीएम आहे. कंपनी पंख्याच्या मोटरवर 10 वर्षांची वॉरंटी देत आहे. या पंख्याची किंमत 1,25,000 रुपये असून, पंख्याला कंपनीची वेबसाईट अथवा बंगळुरु, कोच्ची आणि हैदराबाद येथील शोरुम्स मधून देखील खरेदी करता येईल.

Leave a Comment