जाणून घ्या टिकली लावल्याने होणारे फायदे


टिकलीचाही महिलांच्या १६ श्रृंगारमध्ये समावेश असून सौभाग्यवती महिला काही वर्षांपूर्वी कुंकवाचा वापर करत असत. पण कुंकवाचा वापर न करता टिकलीचा वापर सध्या महिलावर्ग मोठ्या प्रमाणात करताना पहायला मिळतात. महिला चेह-यावर लावण्यात आलेल्या टिकलीमुळे केवळ सुंदरच दिसत नाहीत तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टिकलीचा वापर सामान्यत: महिला ट्रेडीशनल लुकसाठी करतात. पण एका अभ्यासानुसार आरोग्यालाही टिकलीमुळे अनेक फायदे होतात. यामुळेच टिकलीचा वापर अनेक महिला करत आहेत. एवढेच नाही तर वेस्टर्न कपडे परिधान करणा-या महिलाही आपल्या ड्रेसनुसार कलरफुल टिकली वापरण्यास सुरुवात करत आहेत. चेह-यावरील टिकलीमुळे महिला खुपच सुंदर दिसतात आणि त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. कपाळावर टिकली लावण्याने अनेक फायदे होतात.

कपाळावर टिकली लावल्यामुळे डोक दुखणे बंद होते. अॅक्युप्रेशर नुसार कपाळावर ज्या ठिकाणी टिकली लावण्यात येते त्या जागेवर मसाज केल्यास डोकेदुखी तात्काळ बंद होते. टिकली लावलेल्या जागेवर मसाज केल्यास नाकाच्या आस-पास ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुम्हाला खुपच आराम मिळतो.

टिकली दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते शरीरातील सर्व नसा त्याच केंद्रावर एकत्र येतात. टिकली लावण्यात येणा-या या जागेला अग्नि चक्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणूनच टिकली लावल्याने एकाग्रताही वाढते आणि मन शांत राहते. तसेच, टिकली लावल्याने ताण-तणावही कमी होतो.

तुम्हाला पूर्ण झोप मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त आहात तर टिकली लावणे तुमच्यासाठी खुपच फायदेशीर होऊ शकते. टिकली शरीरच्या वरच्या भागाला शांत ठेवण्यासाठी खुपच फायदेशीर ठरते. कपाळावर टिकली लावल्याने चांगली झोप येते.

टिकली डोळ्यांच्या नसा मजबूत करण्यास खुपच मदत करते. टिकली कपाळ्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते त्या ठिकाणच्या नसा आणि डोळ्यांमधील नस यांच्यात एक कनेक्शन असते. टिकली डोळ्यांच्याच्या नसांना मजबूत करण्यास मदत करते ज्यामुळे तुम्हाला एकदम स्पष्ट आणि साफ दिसण्यास मदत होते. एवढेच नाही तर टिकली लावल्याने आस-पासचे मसल्स मजबूत आणि हेल्दी होतात.

तुमच्या चेह-यावर जर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होत आहे तर टिकली लावण्यास तुम्ही सुरुवात करा. कारण, टिकली लावल्याने चेह-यावर येणा-या सुरकुत्यांपासुन सुटका मिळण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment