एवढे टक्के मिळवून 105 वर्षांच्या आजीबाई झाल्या चौथी उत्तीर्ण

केरळच्या पराकुलम येथील 105 वर्षीय आजीबाई भागीरथी अम्मा या चौथीची परिक्षा 74.5 टक्क्यांसह उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी ही परिक्षा दिली होती. ही परिक्षा पास करणाऱ्या त्या केरळमधील सर्वात मोठ्या विद्यार्थीनी ठरल्या आहेत.

भागीरथी यांनी केरळच्या साक्षरता अभियानंतर्गत चौथीच्या समकक्ष परिक्षेत 275 गुणांपैकी 205 गुण मिळवले. या परिक्षेत चार विषय होते. त्यातील गणितात त्यांना 75 पैकी 75 गुण मिळाले. मल्याळम आणि नमलमल नममकु चटुम यामध्ये 50 पैकी 50 गुण आणि इंग्रजीत 50 पैकी 30 गुण मिळाले. या मिशनचे डायरेक्टर पीएस शुक्ला यांनी स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली.

Image Credited – Bhaskar

भागीरथी यांना 6 मुले आणि 16 नातवंड आहेत. त्यांच्या पतीचे 70 वर्षांपुर्वी निधन झाले आहे. 9 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर भावा-बहिणीच्या पालन-पोषणासाठी त्यांनी तिसरीनंतर शिक्षण सोडले होते. आता त्यांच्या मुलांचे लग्न झाले असल्याने त्यांनी केरळच्या साक्षरता अभियानांतर्गत परिक्षा दिली.

Leave a Comment