कोरोनाचे रुग्ण तपासण्यासाठी 10 मिनिटात डॉक्टरने उरकले लग्न

चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 400 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. रुग्णांची संख्या हजारोंनी असल्याने डॉक्टरांची देखील मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. अशा सर्व घटनांमध्ये चीनमधील एका डॉक्टरने लग्न केले आहे. मात्र या डॉक्टरने केवळ 10 मिनिटांमध्ये आपले लग्न उरकले. कारण त्याला कोरोना व्हायरसच्या रुग्णांना तपासण्यास जायचे होते.

डॉक्टर ली झिकीयांग आणि यू हाँग्यान यांनी 30 जानेवारीला लग्न केले. दोघांनीही ठरवले होते की अगदी साध्या पद्धतीने विवाह करायचा व लवकरात लवकर लग्नाचा सर्व कार्यक्रम पार पाडयचा. कारण ली हे डॉक्टर असून, त्यांना त्वरित रुग्णांना तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये परतायचे होते.

एवढेच नाही तर दोघांनी लग्नानंतर जेवण देखील एकत्र केले नाही. या लग्नाला केवळ तीनजण उपस्थित होते. चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी लागू आहे.

Leave a Comment