‘गोहत्येसाठी वाघाला देखील शिक्षा व्हावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे हास्यास्पद वक्तव्य

नेतेमंडळी आपल्या विचित्र विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल अलेमाओ हे आपल्या विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गोवा विधानसभेत वाघ मारले जात असल्याच्या मुद्यावरून चर्चा सुरु होती. यावेळी चर्चिल म्हणाले की, ज्या प्रमाणे गोहत्येसाठी मनुष्याला शिक्षा दिली जाते, त्याप्रमाणे वाघांना देखील शिक्षा झाली पाहिजे.

विधानसभेत वाघांच्या हत्येबद्दल चर्चा सुरू होती. मागील महिन्यात महादयी वन्यजीव अभयारण्यात एक वाघिन आणि तिच्या 5 बछड्यांना जमावाकडून ठार करण्यात आले होते. यावरच चर्चा सुरू होती. यावेळी चर्चिल म्हणाले की, जर एखाद्या वाघाने गाईला खाल्ले तर त्याला काय शिक्षा मिळावी ? जेव्हा एखादी व्यक्ती गायला खातो, तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते. जंगल आणि तेथील प्राण्यांच्या बाबतीत वाघ महत्त्वाचे आहेत. मात्र मनुष्याविषयी विचार करायचा तर गाय महत्त्वाची आहे.

ते म्हणाले की, मनुष्याप्रमाणेच वाघांना देखील गाय खाल्ल्यावर शिक्षा मिळायला हवी.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले की, वाघाना शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे त्यांनी वाघांना मारले. वाघाच्या हल्ल्यात ज्या शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी मारले गेले आहेत, त्यांना भरपाई देण्यात यावी व असे पुन्हा घडू नये याची काळजी घ्यावी.

https://twitter.com/aawaargee/status/1225004855141363712

सोशल मीडियावर आमदार चर्चिल यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे.

Leave a Comment