नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल


अंबोली पोलिसांनी बुधवारी नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यासह दोन महिलांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा बॉलीवूडमध्ये सहायक नृत्यदिग्दर्शिकेच्या तक्रारीवरून करण्यात आला आहे.

गणेश आचार्य यांनी आपल्याला अश्लिल चित्रफित (पॉर्न) पाहाण्यासाठी आग्रह केला. आपण त्यांच्या मागण्या अमान्य केल्यामुळे आपले असोसिएशनमधील सदस्यत्व त्यांनी निलंबित केले. तसेच अन्य कुठे काम मिळू नये यासाठी प्रयत्न केला, असे आरोप तक्रारदार तरुणीने केल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.

Leave a Comment