…अन् फूल विक्रेत्याच्या खात्यात अचानक जमा झाले 30 कोटी रुपये

कर्नाटकमधील चन्नापटना येथील एक फूल विक्रेत्याच्या पत्नीच्या बँक खात्यात अचानक तब्बल 30 कोटी रुपये जमा झाल्याची घटना समोर आली आहे. अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याने त्या फुल विक्रेत्याला आश्चर्याचा धक्का बसला.

या फुल विक्रेत्याचे नाव सईद मलिक बुरहान असून, एकेदिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन एवढे पैसे खात्यात कसे आले, याविषयी चौकशी केली. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला.

बुरहान यांनी सांगितले की, 2 डिसेंबरला बँकेचे अधिकार आमच्या घराची चौकशी करु लागले. त्यांनी सांगितले की पत्नीच्या खात्यात एवढी रक्कम जमा झाली असून, पत्नीसोबत आधार कार्ड घेऊन येण्यास सांगण्यात आले.

बुरहान यांनी सांगितले की, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एका कागदपत्रावर स्वाक्षरीसाठी दबाव देखील आणला, मात्र त्यांनी यास नकार दिला.

बुरहान यांच्यानुसार, खात्यात केवळ 60 रुपये होते. मात्र एवढी रक्कम कशी आली काहीही समजले नाही. एका ऑनलाईन पोर्टलवरून साडी खरेदी केली होती. त्यानंतर कार जिंकल्याने बँकेच्या खात्याची माहिती दिली होती. एवढी रक्कम कशी आली, याचा ते शोधत घेत आहेत.

बुरहान यांनी आयकर विभागाकडे देखील तक्रार दाखल केली. मात्र विभाग सुरुवातीला याचा तपास करण्यास इच्छुक नव्हते. तक्रारीच्या आधारावर चन्नापटना शहरातील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनुसार, त्यांच्या खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाले होते, ज्याबद्दल त्यांनाच माहिती नव्हते.

Leave a Comment