‘श्री दरबार साहिब’च्या लाकडी प्रतिकृतीची गिनीज बुकात नोंद

पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यातील मलकाना गावातील 16 वर्षीय विद्यार्थी आकाशने आपल्या कामगिरीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे. आकाशने श्री दरबार साहिबचे 400 वर्ष जुने मॉडेल 18X27 इंच लाकडावर तयार केले आहे.

या कामगिरीसाठी त्याचे नाव मायक्रो आर्टआर्टिस्ट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे.

Image Credited – Bhaskar

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने आकाशला प्रमाणपत्र जारी केले आहे. हे 400 वर्ष जुने मॉडेल बनविण्यासाठी त्याला 4 महिन्यांचा कालावधी लागला. तो 5वीमध्ये असल्यापासून मायक्रो आर्ट तयार करत आहे.

Leave a Comment