जिच्यासोबत होती अफेअरची चर्चा, तिचे कन्यादान करणार अनुप जलोटा


गेल्या वर्षी बिग बॉसमुळे भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू दोघेही खूप चर्चेत राहिले. आता जसलीन लवकरच विवाहबद्ध होणार असून तिचे कन्यादान करण्यासाठी अनुप जलोटा तयार आहेत.

याबाबत अनुप जलोटा म्हणतात, की जसलीनसाठी मी कन्यादान करायला तयार आहे. ती माझ्या मुलीसारखी आहे. माझ्याबद्दल कुणी काय म्हणेल, याची मला परवा नाही. साधू-संत आदरणीय असतात, पण मी साधू नाही. तर मी आपल्या कामाची साधना करतो. मी जसलीनसोबत एक चित्रपटही करत आहे, यात जसलीन माझी विद्यार्थिनी असेल. मी तिला संगीताचे शिक्षण देत एक कलाकार बनवतो.

केवळ संगीतामुळे मी युवकांमध्ये लोकप्रिय झालो आहे. मला बिग बॉसमध्ये शाळकरी मुले व युवकांनी पाहिल्यानंतर भजन ऐकतील. मेनस्ट्रीम शोमध्ये भाग घेतल्यानंतर आता युवकांशी थेट संवाद साधत आहे. नवीन प्रेक्षक शोच्या माध्यमातून तयार करता येतात. हे यश मोठ्या कष्टाने मी मिळवल्याचेही अनुप जलोटा म्हणाले.

Leave a Comment