एचडी स्क्रीनसह ‘अ‍ॅमेझॉन इको शो’ भारतात लाँच

अ‍ॅमेझॉनने आपले नवीन डिव्हाईस इको शो 8 (Echo Show 8) ला भारतात लाँच केले आहे. युजर्सला या डिव्हाईसमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम, दमदार स्पीकर्स आणि बास रेडिएटर सपोर्ट मिळेल. ग्राहक इको शो 8 ला काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगात खरेदी करू शकतात.

अ‍ॅमेझॉन इको शो 8 ला 12,999 रुपये किंमतीसह सादर करण्यात आले आहे. मात्र मर्यादित ऑफरमध्ये या डिव्हाईसला 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ग्राहक या डिव्हाईस प्री-बुक करू शकतात. 26 फेब्रुवारीपासून याची डिलिव्हरी सुरु होईल.

Image Credited – Cnet

फीचर्सबद्दल सांगायचे तर या डिव्हाईसमध्ये 8 इंच एचडी स्क्रीन दिली आहे. सोबतच युजर्सला दोन नेओडिमियम स्पीकर्ससोबत बास रेडिएटर सपोर्ट मिळेल. यामध्ये वॉइस रिकॉग्निशनसाठी 4 मायक्रोफोन देण्यात आलेले आहेत. या डिव्हाईसमध्ये अ‍ॅलेक्सा सपोर्ट मिळेल.

Image Credited – The Ambient

कंपनीने या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक एमटी8163 प्रोसेसरसोबत 1 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल बँड वाय-फाय सपोर्ट मिळेल. मायक्रोफोन आणि कॅमेरा कंट्रोल करण्यासाठी यात बटन देखील मिळेल.

युजर्सला अ‍ॅमेझॉन इको शोमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, वूट, प्राइम म्यूझिक, अ‍ॅपल म्यूझिक, गाना, जिओ सावन आणि हंगामा सारखे प्रिमियम अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन मिळेल.

Leave a Comment