9 वर्षीय मुलाने युट्यूबवरून शिकलेल्या टेक्निकद्वारे वाचले भावाचे प्राण

अमेरिकेतील एका 9 वर्षीय टिमोथी नावाच्या मुलाने युट्यूबवरून शिकलेल्या प्राण वाचवण्याच्या टेक्निकद्वारे आपल्या 6 वर्षीय छोट्या चुलत भावाचे प्राण वाचवले आहेत.

दोघेही अमेरिकेतील टेनेसी येथील मॅक्नेरी काउंटीमध्ये फिरत होते. यावेळी टिमोथीचा भाऊ कॉनोरचा श्वास गुदमरू लागला. चालता चालता अचानक कॉनोरला श्वास घेताना त्रास होऊन लागला. यावेळी टिमोथीने युट्यूबवर पाहिलेल्या हेमलिच टेक्निकद्वारे आपल्या भावाचे प्राण वाचवले. हेमलिच श्वास गुदमरल्यावर प्राण वाचवण्याची एक टेक्निक आहे. यामध्ये व्यक्तीचे पोट दाबून अडकलेला श्वास पुन्हा पुर्ववत केला जातो.

या घटनेला युट्यूबच्या सीईओ सुझॅन व्होझसिकी यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केले. युट्यूबवर असे अनेक व्हिडीओ आहेत, जे खूपच उपयोगी आहेत.

Leave a Comment