कुणाच्या आदेशाने बनविला गेला कोरोना विषाणू


फोटो सौजन्य पत्रिका
चीन मधून फैलाव झालेल्या कोरोना विषाणूचे भयं जगभर वेगाने पसरत चालले असताना हा विषाणू नक्की कुणाच्या आज्ञेने आणि कशासाठी बनविला गेला याचा खुलासा जी न्यूज या चीनी वेबसाईटने केला आहे. चीन मध्ये या विषाणूने आत्तापर्यंत ४२५ बळी घेतले असून २० हजाराहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. जी न्यूज वेबसाईटवरील माहितीनुसार हा विषाणू मार्केट मधून पसरलेला नाही तर वुहान जवळ असलेल्या पी ४ लॅब मधून चुकीने त्याचा प्रसार झाला आहे.

वैज्ञानिक डेयीन ग्यो यांनी हा विषाणू बनविला आणि त्यासाठी त्यांना १० वर्षे लागली. चीनचे उपराष्ट्रपती वांग किशान यांनी या विषाणूचा अॅटॅक करण्याचे आदेश दिले होते. मात्र चीनकडून हा विषाणू अमेरिकेने बनविल्याचा प्रसार केला जात आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने हा विषाणू मार्केट मधून पसरलेला नाही हे मान्य केले आहे तसेच हा विषाणू त्यांच्या बायोलॉजीकल वेपनचा हिस्सा होता हेहे मान्य केले आहे मात्र अमेरिकेने हा विषाणू तयार केला असा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे या विषाणूची पहिली केस वुहान मध्येच आढळली. त्यापूर्वी उपराष्ट्रपती वांग यांनी वुहानचा गुप्त दौरा केला होता. पी ४ लॅब वुहानमधील सीफूड मार्केट पासून २० मैल अंतरावर आहे. वेबसाईटच्या म्हणण्यानुसार चीन कम्युनिट पार्टीने मानवी चुकीमुळे या लॅब मधून हा विषाणू लिक झाल्याचे मान्य केले आहे मात्र तशी अधिकृत घोषणा पार्टीने केलेली नाही.

हा विषाणू बनविण्यासाठी १० वर्षे संशोधन केले गेले असून त्याचा उपयोग सार्स सारख्या साथीच्या आजारावर काबू मिळविण्यासाठी उपाय शोधणे हा होता असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment