राष्ट्रपती भवन मधील मुघल गार्डन खुली


फोटो सौजन्य कॅच न्यूज
दिल्लीच्या राष्ट्रपती भवन मधील ऐतिहासिक मुघल गार्डन ५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली गेली आहे. दरवर्षी फेब्रुवारीत हा बगीचा सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला केला जातो आणि देशातून तसेच विदेशातून अनेक लोक येथे आवर्जून भेट देतात. अनेक रंगांचे मनमोहक गुलाब, ट्युलिप, सफेत डेझी अशी अनेक प्रकारची फुले येथे फुलली असून यंदा १० हजार विविध रंगी ट्युलिप्सनी या बागेच्या शोभेत भर घातली आहे.


येथे १३८ प्रकारचे गुलाब १७० प्रकारची ५ हजाराहून अधिक सिझनल फुले फुलली असून दुर्लभ आणि आकर्षक गुलाब हे तिचे मुख्य आकर्षण आहे. यंदा ग्रेस ऑफ मोनाको हा गुलाब विशेष आकर्षण बिंदू आहे. हे रोप गतवर्षी मोनाकोचे प्रिन्स एल्बर्ट द्वितीय यांनी लावले होते. येथे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, राणी एलिझाबेथ द्वितीय, अमेरिकेचे माजी अध्यक्ष केनेडी यांच्या नावाचे गुलाब पाहायला मिळतात.

राष्ट्रपती भवन परिसरात १३ एकर जागेत ही बाग असून ती मोघल शैलीत आहे. फुलझाडांसोबत येथे अनेक औषधी वनस्पती लावल्या गेल्या आहेत. येथे म्युझिक गार्डन सुद्धा आहे आणि तेथे संगीताच्या तालावर कारंजी उडतात. या बागेत अनेक प्रकारचे बोन्साय पाहायला मिळतात.

Leave a Comment