या खासगी कंपनीत आहेत सर्वाधिक कर्मचारी


फोटो सौजन्य व्हीटीव्ही
जगभरात सर्वाधिक कर्मचारी असलेल्या कंपन्याची नावे घेताना त्यात टीसीएस, अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या कंपन्यांची नावे नजरेसमोर येतात. मात्र बंगलोर येथील क्वेस कॉर्पचे नाव चटकन कुणाला आठवत नाही. या खासगी कंपनीत सर्वाधिक कर्मचारी काम करत असून ही संख्या ३ लाख ८५ हजार इतकी आहे. ही कंपनी दिग्गज कंपन्यांना स्टाफिंग सोल्युशन प्रोव्हाईड करण्याचे काम करते. आजघडीला टीसीएस मधील कर्मचाऱ्यांची संख्या ४ लाख ४६ हजार दिसत असली तरी त्यातील ९० हजार कर्मचारी विदेशात आहेत. त्यामुळे क्वेस कॉर्प हीच भारतातील सर्वाधिक कर्मचारी असणारी कंपनी ठरली आहे.

२०१६ पासून या कंपनीची वाढ दरवर्षी ३८ टक्के वेगाने होत आहे. त्याला वर्कर आउटसोर्स डिमांडचा सर्वाधिक हातभार लागला आहे. कंपनीचे सीइओ सुरज मोरजे म्हणाले, ई कॉमर्स कंपन्यांना डिलीव्हरी बॉयची मोठी गरज असते आणि त्यामुळे आमच्या कंपनीची वाढ वेगाने होत आहे. सुमारे २०० कंपन्या आमच्या ग्राहक असून त्यात सॅमसंग, अमेझॉन, रिलायंस, व्होडाफोन, बजाज फायनान्स अश्या अनेक कंपन्या आहेत. विदेशातही कंपनीचे ५ हजार कर्मचारी असून त्यात सर्वाधिक कर्मचारी सिंगापूर येथे आहेत.

मोरजे म्हणाले पूर्वी म्हणजे २०१० मध्ये डिलीव्हरी बॉयला ६ ते ७ हजार रुपये पगार मिळत होता आता तो २० हजारापर्यंत गेला आहे. त्यांच्या कंपनीत हे पगार १२ ते ४० हजार दरम्यान आहेत. कंपनीतील ७५ टक्के कर्मचारी २१ ते ३५ वयोगटातील आहेत आणि दरवर्षी कंपनी १० लाख लोकांचे इंटरव्ह्यू घेते. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स, पीएफ सुविधा दिल्या जातात.

Leave a Comment