पंतप्रधान मोदींनी अनुभवला फायरिंगचा रोमांच


फोटो सौजन्य जागरण
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे ५ ते ९ फेब्रुवारी या काळात होत असलेल्या डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन काल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले आणि यावेळी पंतप्रधानांनी व्हर्च्युअल शुटींग रेंज मध्ये फायरिंग करण्याचा रोमांच अनुभवला. यावेळी पंतप्रधानांनी अनेक निशाणे साधले.

मिळालेल्या माहितीनुसार एक्स्पोचे उद्घाटन केल्यावर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वृंदावन मैदानावर भरविल्या गेलेल्या अत्याधुनिक हत्यारांच्या प्रदर्शनाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचवेळी व्हर्च्युअल फायरिंग रेंज मध्ये पोहोचल्यावर पंतप्रधानांनी हातात मशीनगन घेऊन फायरिंगचा रोमांच अनुभवला.

व्हर्च्युअल फायरिंग रेंज ही विज्ञानाची करामत असून यात प्रत्यक्ष गोळ्या न झाडता निशाणा साधता येतो. सैनिक या रेंजमध्ये त्यांची क्षमता तपासून पाहू शकतात आणि त्यात आवश्यक सुधारणा करून त्यांचे कौशल्य वाढवू शकतात. हे प्रशिक्षण सैनिकांसाठी फार गरजेचे आहे कारण यात प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाताही युद्धभूमीचा अनुभव मिळतो. येथे सैनिक निशानेबाजी करू शकतात आणि युद्ध कौशल्य वाढवू शकतात.

Leave a Comment