मोबाईल चोरीला गेल्यास सरकारकडे या ठिकाणी करा तक्रार

तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास आता तुम्ही थेट सरकारकडे याबाबत तक्रार करू शकणार आहात. यासाठी सरकारने सीईआयआर वेबसाईट लाँच केली होती. या वेबसाईटवर सरकार हरवलेल्या अथवा चोरी गेलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवू शकतात. सोबतच युजर्स चोरीला गेलेल्या फोनचा नंबर देखील ब्लॉक करू शकतात.

Image Credited – Amarujala

वेबसाईटवर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला एफआयआरची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल. चोरी अथवा हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सीईआयआरची अधिकृत वेबसाईट https://ceir.gov.in/Home/index.jsp वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला साइनअप करावे.

Image Credited – Amarujala

त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला वरती सीईआयआर सर्व्हिसचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील, त्यातील Block Stolen / Lost Mobile पर्याय निवडा.

Image Credited – Amarujala

यानंतर एक पेज उघडेल. ज्यात तुम्हाला चोरी अथवा हरवलेल्या डिव्हाईसची माहिती द्यावी लागेल. येथे तुम्हाला मोबाईल नंबर, फोनचा ईएमआय नंबर आणि मोबाईल बिलाची कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा फोन चोरी अथवा हरवला आहे, त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. सोबतच एफआयआरची कॉपी अपलोड करावी लागेल.

Image Credited – Amarujala

हे केल्यानंतर तुम्हाला नाव आणि पत्ता द्यावा लागेल. तसेच आधार कार्डची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल. यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर तुमची तक्रार नोंदवली जाईल. सध्या ही सुविधा केवळ महाराष्ट्र आणि नवी दिल्लीतील नागरिकांसाठीच आहे.

Leave a Comment