उर्वशीच्या ब्लॅक गाऊनवर नेटकरी फिदा


बॉलिवूडमध्ये ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मिडियावर बरीच अॅक्टिव्ह असल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. तिचे अॅमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या वेळीचे ब्लॅक गाऊनमधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो हॉटनेसच्या बाबतीत नेहमीच अव्वल असणा-या उर्वशीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. यात उर्वशीचा लूक खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.


उर्वशीने आपल्या चाहत्यांना घायाळ करतील असे फोटो शेअर करुन तिने ‘’m not weird; I’m a limited edition’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. याचाच अर्थ मी जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी लिमिटेड एडिशन आहे असे म्हटले आहे.


मॉडेल म्हणून आपल्या कारर्किदीला सुरुवात करणाऱ्या उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये आलेल्या ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड कारर्किदीला सुरुवात केली. तिने त्यानंतर ‘रेस-3’, ‘सनम रे’, ‘भाग जॉनी’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली.


जरी उर्वशी चित्रपटात कमी दिसत आली तरी ती बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसते. यात तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिच्या मादक अदा तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या असतात.

Leave a Comment