शेलारांच्या वक्तव्याला शिवसैनिकांचे होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर


मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त टीका केल्यामुळे मंबईत अनेक ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने केली आणि होर्डिंगही लावले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्त होर्डिंग मुंबईत शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लावले. त्याचबरोबर आशिष शेलार यांचे होर्डिंग भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही लावण्यात आले आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रस्त्यांवरही दिसून येत आहे. आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्न अवस्थेत या होर्डिंगमध्ये दाखवण्यात आले आहेत. तसेच आ’शिषे’ मे देख आणि इतर असंसदीय भाषेतील वाक्ये लिहिण्यात आली आहेत.

Leave a Comment