पोप यांच्या आदेशावरून बेघरांसाठी उघडला 220 वर्ष जुना पॅलेस

19 व्या शतकातील एका पॅलेसला गरीब व बेघर लोकांना आश्रय देण्यासाठी उघडण्यात आले आहे. हे पॅलेस व्हॅटिकन सिटीची संपत्ती आहे, ज्याला पोप यांच्या आदेशावरून बेघर लोकांसाठी उघडण्यात आले आहे. बेडरूम, डायनिंग रुम आणि अन्य सुविधा असणाऱ्या पलाजो मिग्लियोगी पॅलेसला आधी लग्झरी हॉटेलमध्ये बलण्यात येणार होते. मात्र पॉप फ्रान्सिस यांनी सांगितले की हे पॅलेस हॉटेल ऐवजी बेघर लोकांसाठी उघडण्यात यावे.

हे पॅलेस 19व्या शकताक महिलांसाठी धार्मिक समूहाचे मुख्यालय होते. लहान मुले आणि त्यांच्या आईची देखील येथे काळजी घेतली जात असे.

या 4 मजली इमारतीला मागील वर्षी पुनर्निमाण करण्यात आले होते. हे पॅलेस सेंट पीटर स्केअरजवळ मुख्य ठिकाणी आहे. या पॅलेसची पुनर्निर्माण झाल्यानंतर अनेकांनी याला लग्झरी हॉटेलमध्ये बदलावे, जेणेकरून कॅथेलिक चर्चला भरपूर उत्पन्न मिळेल, असा सल्ला दिला होता.

मात्र या पॉप यांच्या आदेशानंतर हे पॅलेस सामाजिक सहाय्यता म्हणून वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे राहणारे लोक अन्य ठिकाणी रहाणाऱ्या बेघर लोकांसाठी जेवण बनवून देखील नेऊ शकतात.

या पॅलेसला सन 1800 मध्ये बांधण्यात आले होते. यात जवळपास 16 मोठमोठे बेडरूम आहेत. यात डायनिंग टेबलपासून ते बाथरुमपर्यंत सर्व सुविधा आहेत. सध्या येथे 50 महिला आणि 50 पुरुष अशा 100 लोकांना राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याच्या सर्वात खालच्या मजल्यावर कॉम्प्युटर, लायब्रेरी, मनोरंजन अशा अनेक सुविधा आहेत.

Leave a Comment