लेडी गागाने केला आपल्या नव्या रिलेशनशिपचा खुलासा


अमेरिकन पॉप गायिका लेडी गागा सुपर बाऊल ओव्हरच्या कार्यक्रमात एन्जॉय करताना आपल्या प्रियकरासह दिसली. ती मियामी येथील हार्ड रॉक स्टेडियममध्ये सुपर बाऊल लीव शोमध्ये प्रियकरासोबत आली होती. लेडी गागाच्या या नव्या मित्राचे नाव मिशेल पोलन्स्की असे आहे. तो सॅन फ्रान्सिस्कोच्या पारकर ग्रुपचा सीईओ आहे. मिशेल आणि लेडी गागा या शोमध्ये चुंबन घेताना दिसले.


मिशेलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे गायिका लेडी गागाने जाहिरपणे कबुल केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करुन या बातमीला दुजोरा दिला आहे. तिने कॅप्शनमध्ये मियामीमध्ये भरपूर मजा मस्ती केल्याचे लिहिले आहे. यापूर्वी लेडी गागा आणि ख्रिस्तियन कॅरिनो याचे प्रेम प्रकरण खूप चर्चेत होते.

पण त्यांचे गेल्या वर्षी ब्रेकअप होऊन दोघे वेगळे झाले. गागाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपले नाते तुटल्याचे सांगितले होते. तिने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये एंगेजमेंट रिंग घातली नव्हती. तेव्हापासून लेडी गागा आणि ख्रिस्तियन कॅरिनोच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली होती. अखेर तिच्या जीवनात नव्या मित्राने स्थान मिळवले आहे.

Leave a Comment