…म्हणून बेझॉस यांना भरावा लागला 12 लाख रुपये पार्किंग दंड

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझॉस यांनी वॉशिंग्टन डीसी येथील आपल्या 1.63 अब्ज रुपये (23 मिलियन डॉलर) किंमतीच्या मँशनच्या (हवेली) रिनोव्हेशनसाठी 12 लाख रुपये पार्किंग शुल्क भरले आहे. बेझॉसच्या कॉन्ट्रॅक्टर्सची एक टीम टेक्सटाइल म्यूझियमला एका घरात बदलत आहे. बेझॉस संपत्तीच्या रिनोव्हेशनवर 85.45 कोटी रुपये (12 मिलियन डॉलर) खर्च करणार आहेत.

बेझॉसच्या टीमने ऑक्टोंबर 2016 पासून ते ऑक्टोंबर 2019 मध्ये 564 पार्किंग तिकीट घेतले व यासाठी 11.99 लाख रुपये भरले. यातील 93 तिकीट हे एप्रिल 2019 मध्ये जारी करण्यात आले होते.  पार्किंगचा वापर रिनोव्हेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सामान ठेवण्यासाठी केला होता.

डीसी डिपार्टमेंट ऑफ पब्लिक वर्क रेकॉर्ड्सनुसार, बेझॉस यांचे मेंशन शहराती एस स्ट्रीटच्या 2200 आणि 2300 ब्लॉक येथे आहे. प्रशासनाने या तिकीटांना नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, रिझर्व्ह पार्किंगच्या जागेचा वापर करणे, सार्वजनिक रस्ता बंद करणे, फुटपाथ बंद करणे यासाठी जारी केले.

डिपार्टमेंट प्रमाणेच वाहतूक विभागने अशाच 4 लाख रुपयांच्या तिकीटांचा शोध घेतला, ज्यांची रक्कम जमा करण्यात आली नव्हती.

Leave a Comment