गुगल देणार तुमच्यासाठी असलेल्या सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनची माहिती

कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करत असतो. आता गुगलने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. गुगल आता तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये तुमच्यासाठी असलेले सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन देखील सांगणार आहे.

आता तुम्हाला प्री-पेड प्लॅन रिचार्ज करण्यासाठी कोणाला विचारण्याची अथवा कस्टमर केअरला विचारण्याची गरज नाही. तुम्ही थेट गुगलला सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल विचारू शकता.

Image Credited – Amarujala

गुगलने प्री-पेड मोबाईल रिचार्जचा पर्याय सर्चबारमध्ये दिला आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही  “sim recharge” अथवा “prepaid mobile recharge” हे सर्च केल्यास तुम्हाला सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन दिसतील. खाली तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल.

सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक प्लॅन्स दिसतील. ज्यातील तुम्ही तुमच्या आवडीचा निवडू शकता. प्लॅन निवडल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. यानंतर तुम्ही गुगल पे, पेटीएम, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज यासारख्या कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करता येईल. हे फीचर पोस्टपेड रिचार्जसाठी नाही.

गुगलचे हे नवीन फीचर एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि बीएसएनएल यासाठी सपोर्ट करते. सध्या हे फीचर भारताच्या बाहेर चालत नाही. लवकरच भारताच्या बाहेर देखील हे फीचर जारी करण्यात येणार आहे.

Leave a Comment