‘गुगल पे’मध्ये आढळलेल्या बगमुळे आपसूक डिलीट होत आहेत बँक खाती

भारतात मोठ्या संख्येत वापरण्यात येणारे डिजिटल पेमेंट अॅप गुगल पेमध्ये एक मोठा बग असल्याचे समोर आले आहे. गुगल पे मधील या बगमध्ये अनेक युजर्सचे बँक अकाउंट आपोआप डिलीट होत आहे. गुगल पेच्या या बगमुळे लोकांना व्यवहार करण्यास समस्या निर्माण होत आहे. याबाबत अनेक ट्विटरवर तक्रार केली आहे.

ट्विटरवर युजर्सनी केलेल्या तक्रारीनुसार गुगल पे अॅपमध्ये त्यांचे बँक अकाउंट दिसत नाही. यानंतर गुगल पे पुन्हा बँक अकाउंट लिक करण्यास सांगत आहे. ज्या लोकांनी या बगबद्दल माहिती दिली आहे, त्यातील बहुतांश लोकांचे अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे आहे.

ही समस्या केवळ अँड्राईड युजर्सला येत आहे की आयफोन युजर्सला देखील हे अद्याप समोर आलेले नाही. हे बग्स आता फिक्स करण्यात आले आहे.

मागील वर्षी सप्टेंबरपर्यंत भारतात गुगल पे च्या युजर्सची संख्या 6.7 कोटी होती. गुगल पे द्वारे भारतात दरवर्षी 7,82,800 कोटींचा व्यवहार होत आहे.

Leave a Comment