अरेच्चा ! कंपनीने एकाच व्यक्तीला पाठवली एकसारखी 55 हजार पत्रे

अमेरिकेमधील ओहियो येथील ट्विन्सबर्ग येथे राहणाऱ्या डेन केइनला एका लोन कंपनीने तब्बल 55 हजार पेमेंट स्टेटमेंट पत्र पोस्टाने पाठवल्याचे समोर आले आहे. डेन केइन यांच्या मुलीच्या कॉलेज ट्यूशन लोक कंपनीने ही पत्रे पाठवली. ही पत्रे पाहून केन यांचे कुटुंब देखील हैराण झाले. ही पत्रे 79 बॉक्समध्ये होती. कंपनीला या पत्रांसाठी 21 लाख रुपये खर्च आला.

केइनला पोस्टमनने सांगितले की त्यांच्या नावाने आलेली असंख्य पत्रे पोस्ट ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर केन यांनी दोनवेळा ट्रक भरून पत्रे आणली व आपल्या गॅरेजमध्ये ठेवली. माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर कॉलेज एवेन्यू स्टूडेंट लोन कंपनीने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

केइन यांनी सांगितली की, हे पेमेंट स्टेटमेंट लोन कंपनीने कर्जाचे चुकीचे व्याज जोडल्याने पाठवले आहे. मात्र कंपनीने केइनचे आरोप फेटाळले आहेत. कंपनीने याला डुप्लिकेटिंग मेल सिस्टमची चुकी मानली असून, पत्र लवकरच परत घेतली जातील असे सांगितले.

कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर टिम स्टेले यांनी सांगितले की, आम्ही डेनसोबत मिळून हे प्रकरण सोडवत आहोत. लवकरच सर्व पत्रे परत घेतली जातील. चुकीच्या व्याजाचा बाबत तपासात काहीही समोर आलेले नाही. डेनला झालेल्यासमस्येसाठी आम्ही मागतो.

डेनने सांगितले की, जर असे पत्र परत आल्यास त्यांना स्विकारण्याऐवजी ते कंपनीला परत करतील.

Leave a Comment