कचरा द्या आणि पैसे घ्या, या स्टार्टअपची भन्नाट कल्पना

प्लास्टिकच्या कचऱ्याची मोठी समस्या जगभरात निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून अनेकजण या कचऱ्याला रिसायकल्ड करून यापासून विविध वस्तू बनवत आहे. अशीच हैदराबादची एक स्टार्टअप कंपनी बिटिंक्स लोकांकडून रिसायकल्ड सुका कचरा घेऊन त्यांना त्या बदल्यात पैसे देते. या कचऱ्याला रिसायकल्ड करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते.

या स्टार्टअपची सुरुवात रोशन मिरांडा, उदित पाटीदार आणि जयनारायण कुलथिंगल यांनी 2018 साली केली. त्यांनी आतापर्यंत जवळपास 80 हजार लोकांकडून कचरा जमा केला असून, 250 मॅट्रिक टन कचरा रिसायकल्ड केला आहे. हैदराबादपासून सुरु झालेले त्यांचे काम आता बंगळुरु आणि दिल्लीपर्यंत पोहचले आहे.

Image Credited – Thebetterindia

कोणतीही व्यक्ती या कंपनीचे अ‍ॅप डाउनलोड करुन स्बस्क्रिप्शन घेऊ शकते. स्बस्क्रिप्शन घेताच तुमच्या घरून कंपनी स्वतः कचरा उचलेल. हे स्बस्क्रिप्शन मोफत आहे.  कचऱ्यासाठी बॅग्स देखील दिली जाते. यावर क्यूआर कोड असतो. याद्वारे तुम्ही तुमचा करचा कोठे पोहचला आहे, याची देखील माहिती घेऊ शकता. फॅक्ट्रीवर पोहचल्यानंतर वजनाच्या हिशोबाने कंपनी स्बस्क्राइबर्सला ई-वॉलेटद्वारे पैसे पाठवते.

Image Credited – Thebetterindia

स्बस्क्राइबर्सला 2 रुपये ते 8 रुपये प्रति किलो दिले जातात. जमा केलेल्या कचऱ्याला 30 वेगवेगळ्या विभागात विभागले जाते. ज्यात कागद, बीईटी प्लास्टिक बाटली, सिंगल यूज प्लास्टिक, मल्टीलेअर्ड प्लास्टिक इत्यादी विभागात विभागले जाते. कचऱ्याच्या या बॅग्सला नंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे मान्यताप्राप्त रिसायकलर्सकडे पाठवले जाते. हे रिसायकलर्स कचरा जमा करणे, त्याची विभागणी करणे आणि त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी बिंटिक्सला पैसे देतात.

बिटिंक्सच्या तीन संस्थापकांपैकी उदित यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  रोशन यांनी फार्मास्युटिकल सायन्समध्ये पदवी घेतली आहे. तर तिसरे संस्थापक जयनारायण यांनी फार्माकोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे.

लवकरच बिटिंक्सची सेवा मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये देखील सुरु होणार आहे. 2020 अखेरपर्यंत 40 शहरात पोहचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

Leave a Comment