बहुप्रतिक्षित ‘किआ कार्निव्हल एमपीव्ही’ अखेर लाँच

किआ मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित ‘कार्निव्हल एमपीव्ही’ अखेर ऑटो एक्स्पो 2020 मध्ये लाँच केली आहे. नवीन किआ कार्निव्हल एमपीव्हीची किंमत 24.95 लाख रुपयांपासून सुरु असून, याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 33.95 लाख रुपये आहे. ही एमपीव्ही कम्प्लिटली नॉक्ड डाउन यूनिट स्वरूपात लाँच करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरपासून या एमपीव्हीची डिलिव्हरी सुरु होईल.

किआ कार्निव्हल एमपीव्ही मोठ्या आकाराची असल्याने याच्या कॅबिनमध्ये अधिक जागा आहे. ही एमपीव्ही प्रिमियम, प्रेस्टीज आणि लिमोजिन या तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार 7,8 आणि 9 सीटरमध्ये उपलब्ध आहे.

Image Credited – Livemint

या एमपीव्हीमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, एलईडी हेडलँप्स, फॉग लँप्स आणि टेललँप्स देण्यात आले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टममध्ये  अपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो, लॅपटॉप चार्जिंग पॉइंट, पॉवर्ड टेलगेट, एक टचमध्ये बंद होणारे दरवाजे आणि ड्युअल-झोन क्लाइमेट कंट्रोल फीचर्स देण्यात आलेले आहेत. पाठीमागे बसलेल्या प्रवाशांसाठी 10.1 इंच इंटरटेनमेंट स्क्रिन मिळेल.

Image Credited – livemint

किआ कार्निव्हलमध्ये 2.2 लीटर व्हीजीटी डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. हे बीएस6 मानक इंजिनसह येते. हे इंजिन 197 बीएचपी पॉवर आणि 440 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 8 स्पीड स्टेपट्रॉनिक ट्रांसमिशन देण्यात आलेले आहे. जे पुढील व्हिल्सला पॉवर देते.

Leave a Comment