या ठिकाणी सुरु झाले पाण्यावर तरंगणारे हॉटेल

स्वीडनच्या उत्तर भागातील लॅपलँड क्षेत्रातील ल्यूल नदीवर एक तरंगणारे हॉटेल आणि स्पा ‘द आर्कटिक बाथ’ लोकांसाठी सुरु झाले आहे. लाकडाचे तंरगणारे रस्त आणि बोटीच्या सहाय्याने हॉटेलपर्यंत पोहचता येते. ग्राहक विमानतळावरून हॉटेलपर्यंत पोहचण्यासाठी कार, हॅलिकॉप्टरचा देखील वापर करु शकतात. हॉटेलमध्ये 12 खोल्या आहेत. हे हॉटेल बनविण्याचे काम 2018 साली सुरु झाले होते. अखेर याचे काम पुर्ण झाले असून, आता हे हॉटेल लोकांसाठी सुरु झाले आहे.

या हॉटेलचे डिझाईन आर्किटेक्ट बर्टिल हॅरस्ट्रॉम आणि जोहान कोप्पीन यांनी केली आहे. याला बनवताना नैसर्गिक सुंदरतेची काळजी घेण्यात आलेली आहे.

Image Credited – CNN

या हॉटेलबद्दल लोकांमध्ये एवढी क्रेज आहे की 2020 आणि 2021 साठीचे बुकिंग आधीच सुरु झाले आहे. येथील एक दिवसाचे भाडे 815 पाउंढ (जवळपास 75 हजार रुपये) आहे. हे हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.

Image Credited – CNN

द आर्कटिक बाथ हॉटेलच्या स्पा सेंटरमध्ये वेलनेस थीमवर काम करण्यात आलेले आहे. येथे आहार, व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी विशेष मेडिटेशन थेरेपी दिली जाईल.

Image Credited – CNN

हॉटेलच्या टींने पर्यटक आणि स्थानिक गाव हेराड्स येथील नागरिकांमध्ये ताळमेळ बसवण्यासाठी देखील तयारी सुरू केली आहे. पर्यटक गावातील स्थानिक लोकांकडे जाऊन सेमी संस्कृतिबद्दल माहिती मिळवू शकतील.

Image Credited – CNN

पर्यटकांना येथून खास आढळणारे ध्रुवीय अस्वल, घोडेस्वारी, नॅच्युरल फोटोग्राफीचा देखील आनंद घेता येईल. पर्यटकांना येथून नॉर्दर्न लाइट्स देखील आनंद घेता येईल.

Leave a Comment